धक्कादायक! फुकटचे जेवायला मिळते म्हणून 4 पैकी 1 मुलगी जाते डेटवर: रिसर्च
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकतेच महाराष्ट्रामधील 50 टक्के जास्त पुरुष हे अविवाहित असल्याची माहिती समोर आली होती. कदाचित म्हणूनच आजकाल डेटिंग अॅप्सची (Dating App) लोकप्रियता फार वाढत आहे. मेट्रो शहरांमध्ये तर सर्रास मुले मुली डेटवर जाताना दिसतात. तुम्हीही असेच वरचेवर मुलींना डेटवर घेऊन जात असाल तर सावधान, कारण चारपैकी एक मुलगी ही फुकटचे जेवण मिळते म्हणून डेटला जाते. अशा मुलींच्या मनात रोमान्स किंवा रिलेशनशिपचा कोणताही विचार नसतो. सध्या हा प्रकार चांगलाच ट्रेंडमध्ये असून याला, 'फूडी कॉल' (Foodie Call) असे म्हटले जाते.

कॅलिफोर्निया (California) येथील अजुसा पॅसिफिक युनिव्हर्सिटी (Azusa Pacific University) आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफ्रोर्निया-मेरेड (University of California-Merced) येथील संशोधकांनी याबाबत रिसर्च केला गेला आहे. घेतल्या गेलेल्या सर्व्हेत 23 ते 33 टक्के मुलींनी हे मान्य केले आहे की त्या फक्त फुकटचे जेवायला मिळते म्हणून डेटवर जातात. यासाठी महिला पुरुषांच्यासोबत खोटे भावनिक संबंधही प्रस्थापित करतात. (हेही वाचा: पार्टनरचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आहे? जाणून घ्या का ठेवले जातात विवाहबाह्य संबंध)

घेतल्या गेलेल्या सर्व्हेमध्ये पहिल्या टप्प्यात एकून 820 महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिलांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 357 महिलांचे सर्वेक्षण झाले, त्यामध्ये 33 टक्के महिलांनी ‘होय, फुकटचे जेवायला मिळते म्हणून आम्ही डेटवर जातो’ ही गोष्ट मान्य केली आहे.