Zika Virus: कोरोनानंतर देशासमोर आता झिका व्हायरसचे संकट, आतापर्यंत 21 जणांना संसर्ग
झिका व्हायरस (Photo Credit: PTI)

भारतात करोना विषाणू संक्रमण अद्यापही चिंताजनक स्थितीमध्ये असतानाच देशावर आणखी एका विषाणूची वक्रदृष्टी पडली आहे. ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. केरळमध्ये सापडलेल्या झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात झिका विषाणूच्या आणखी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील झिका विषाणू रुग्णांची संख्या 21 वर पोहचली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय प्रशासन अहोरात्र झटताना दिसत आहे.

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, राज्यात झिका विषाणूची आणखी दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील एक पुंथुरा तर, दुसरा सस्थमंगलम येथील रहिवासी आहेत. या दोघांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांना झिका विषाणूचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यातील झिकाबाधित रुग्णांची आता 21 वर पोहचली आहे. महत्वाच म्हणजे, झीका विषाणू रूग्णांमध्ये ताप, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसतात. हे देखील वाचा- COVID-19 Vaccine Update: Sputnik V च्या निर्मितीमध्ये आता Serum Institute of India देखील सहभागी; सप्टेंबर महिन्यापासून होणार सुरूवात

ट्वीट-

सोमवारीही एका 73 वर्षीय वृद्ध महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळले. त्याचवेळी रविवारी एका मुलासह तीन जणांमध्ये झिका विषाणूचे लक्षणे दिसून आले. त्यानंतर सरकारने राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचणीसाठी 2,100 किटची व्यवस्था केली आहे.

महत्वाचे म्हणजे, एका वर्षापूर्वी केरळ मॉडेलने कोरोना विषाणूवर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळवले होते. मात्र, आता राज्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद केली जात आहे. अनलॉक अंतर्गत घेण्यात आलेल्या काही पावलेमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे.