Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Madhya Pradesh News:  मध्य प्रदेशातील खंडवा येथे एका 42 वर्षीय योग प्रशिक्षकाचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. घरातील काम करत असताना तिचा अंगावर जड वस्तू पडली असताना ही घटना घडली. राधिका श्रीनिवासन असं मृत महिलेचे नाव आहे. ती नवचंडी माता मंदिरातील रहिवासी होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घर काम सुरु असताना, अनपेक्षितपणे जड वस्तू डोक्यावर पडली ज्यामुळे मेंदूतील रक्तस्त्राव झाला.हेही वाचा- शीना बोरा हत्याकांडावर आधारित द इंद्राणी मुखर्जी स्टोरी नावाची डॉक्यु सीरिजचा ट्रेलर रिलीज

मिळालेल्या माहितीनुसार, नवचंडी येथील राधिका घरात साफसफाई करत होती. दरम्यान एका खुर्चीवर उभी असताना तिच्या डोक्यावर जड वस्तू डोक्यावर पडली. तिचा तोल गेला आणि खाली पडली. जड वस्तू पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि तीच्या डोक्यातून रकस्त्राव झाला. शेजारच्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेत तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु ती वाचू शकली नाही. तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. शहरात राहणाऱ्या तीच्या भावंडांना या घटनेची माहिती दिली. तया प्रकराणी मोघाट रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या भावाच्या उपस्थितीत मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला. राधिका घरात एकटी राहायची. राधिकाच्या मृत्यूची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली .