प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) महिलेने 20 दिवसांच्या जुळ्या मुलींचे अर्भक तलावात फेकले आहे. ही घटना मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यात रविवारी घडली आहे. त्यानंतर आपल्या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आई-वडील दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मुलींचे अर्भक तलावाबाहेर काढले आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने आजुबाजूच्या परिसरात असंतोष निर्माण झाला आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलांना तलावात फेकले, यावर कोणाचाही विश्वास बसेना झाला आहे.

नाझमा आणि वसीम असे या दामपत्यांचे नाव आहे. वसीम हा बेरोजगार असून काही दिवसांपासून नाझमाच्या गावी मन्सूरपूर (Mansoorpur) येथे राहत आहे. वसीम याला नोकरी नसल्यामुळे या मुलींचे संगोपन कसे करायचे? असा विचार नाझमा करु लागली होती. वसीमला नोकरी नसल्यामुळे नाझमा आणि वसीम यांच्यात अनेकदा वाद निर्माण झाला. काही दिवसापूर्वी नाझमा आणि वसीम यांच्यात नोकरीच्या विषयावरुन जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात नाझमाने तिच्या जुळ्या मुलींना गावाजवळील तलावात नेऊन फेकले, अशी माहीती मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पोलीस प्रमुख अभिषेक यादव यांनी दिली. हे देखील वाचा-सोलापूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार, निर्मनुष्य स्थळी नेऊन वारंवार केला तिच्यावर बलात्कार

थोड्यावेळाने नाझमाला समजले की, तिच्या हातून खून झाला आहे. त्यानंतर तिने  ग्रामस्थांसमोर आपल्या मुलींचे अपहरण झाल्याची खोट नाट्य केले. माहीती दिली होती. त्यानंतर नाझमा आणि वसीमने आपल्या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली होती. पोलीस निरीक्षक अजय कुमार यांनी या जोडप्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवले. दरम्यान त्यांनीच आपल्या जुळ्या मुलींना गावाजवळील तलावात फेकल्याची कबुली दिली, असे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सांगितले.