Illegal Abortion pc Pixabay 1

Karnataka Shocker: कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी तिच्या पालकांना अटक केले आहे. स्री भ्रूण हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा पालकांवर आरोप करण्यात आला आहे. ही घटना बागलकोट जिल्ह्यातील महालिंग शहरात घडली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी केली काळी जादू; दिला 21 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरे यांचा बळी, DK Shivakumar यांचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, संजय गोवळी आणि संगिता गोवळी असं अटक करण्यात आलेल्या पालकांचे नाव आहे. महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी असलेली सोनाली तिचं महालिंग शहरात लग्न झाले होत. सोनालीला लग्नांनतर दोन मुली झाल्या. पुन्हा तिसऱ्यांदा गरोदर झाल्यानंतर तिच्या कुटुंबाकडून गर्भ लिंग तपासणी केली, त्यात तीला पुन्हा मुलगी होणार असल्याने कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली. सांगली जिल्ह्यात गर्भ लिंग चाचणी करण्यात आली होती.

महिलेचा गर्भपात करण्यासाठी कुटुंबाकडून जबरदस्ती केली जात होती. गर्भपात करण्यासाठी कुटुंबानी रुग्णालयातील नर्सला ४०  हजार रुपये देण्यात आले. ओपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी नर्स सह सात जणांना अटक केले आहे. नर्सवर या आधी देखील एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची माहिती सुरुवातीला सांगली पोलिसांकडे होती त्यानंतर हा गुन्हा महालिंग शहरातील पोलिसांनाकडे वर्ग करण्यात आले. आरोपी नर्सचे नाव कविता आहे. या घटनेनंतर वैद्यकिय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार आहे.