Photo Credit- X

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack)मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करणाऱ्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरला (Operation Sindoor) पाठिंबा दर्शविला आहे. पहलगाम हल्ल्यातील मृत समीर गुहा यांच्या पत्नी साबरी गुहा यांनी प्रतिक्रीया दिली की, 'हे घडायलाच हवे होते. पहलगाममध्ये एवढी मोठी घटना घडली. आमच्या सरकारने प्रत्यत्तर दिले आहे.' त्यांच्या शब्दांतून पहलगाम हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या अनेक कुटुंबांना वाटणारे दुःख आणि न्यायाची इच्छा दिसून आली. पुढील अत्याचार रोखण्यासाठी भारताचे दहशतवादविरोधी प्रयत्न महत्त्वाचे आहेत असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या विधवा पत्नी प्रगती जगदाळे यांनी सरकारच्या या कामगिरीबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. 'त्या दहशतवाद्यांनी आमच्या मुलींचे कुंकू पुसले त्याचे हे योग्य उत्तर आहे,' असे त्या हल्ल्यामुळे झालेल्या भावनिक विध्वंसाचा संदर्भ देत म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, 'या ऑपरेशनचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी सरकारचे मनापासून आभार मानते.'

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">Pune | On <a href="https://twitter.com/hashtag/OperationSindoor?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#OperationSindoor</a>, Pragati Jagdale, wife of Santosh Jagdale who was killed in Pahalgam terror attack, says, &quot;It&#39;s a befitting reply after the way those terrorists erased the vermilion of our daughters...On hearing the name of this operation, I got tears in my eyes. I… <a href="https://t.co/F9AcqHWANk">pic.twitter.com/F9AcqHWANk</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1919923408579555820?ref_src=twsrc%5Etfw">May 7, 2025</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी आशान्या द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या भावनिक महत्त्वाबद्दल सांगितले. 'ही सूडाची सुरुवात आहे. मला माहित आहे की मोदीजी त्यांचा पूर्णपणे नाश करतील. तोपर्यंत ते थांबणार नाहीत. त्यांनी आम्हाला असा विश्वास दिला आहे की आता सर्व दहशतवादी ठिकाणे नष्ट केली जातील.'

त्याशिवाय, 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आलेल्या या ऑपरेशनबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 'ज्या पीडितांच्या कुटुंबियांना सूडाची अपेक्षा होती त्याचे हे प्रतीक आहे. या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देऊन, त्यांनी दाखवून दिले आहे की आम्ही आमच्याकडून घेतलेला सूड घेतला आहे.', असे त्या म्हणाल्या.