Crime: विवाहबाह्य संबंधातून पत्नीचा मृत्यू, पती अटकेत
Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

अंधेरी (Andheri) येथे बुधवारी एका 31 वर्षीय महिलेने आत्महत्या (Suicide) केली. कारण तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) ठेवत होता. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचा पती आणि सासू-सासरे दोघांनीही महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. ज्यामुळे तिने आत्महत्या केली.  महिलेच्या पतीला अटक (Arrested) करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, कनकुकुमारी परमार या महिलेचा गुरूवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आत्महत्येने मृत्यू झाला. तिचा पती प्रशांत परमार आणि सासू उर्मिला यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम 306, 498 अ आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

राजस्थानमधील पाली येथील रहिवासी महिलेची आई पावनीदेवी सुथार यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी प्रशांतलाही उचलले. या जोडप्याचे फेब्रुवारी 2020 मध्ये लग्न झाले. पोलिसांनी सांगितले की, परमार कुटुंबाने 13 दिवस चाललेल्या विवाह सोहळ्यात करण्यात आलेला सर्व खर्च कंकुकुमारीच्या कुटुंबाने नंतर एकूण खर्चाच्या 50 टक्के परतफेड करण्याचे आश्वासन दिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा विवाह झाल्यानंतर छळ सुरू झाला.  कनकुकुमारीने अनेक वेळा तिची आई आणि भावाला तिच्या सासरच्या मंडळींशी निम्मा खर्च परत देण्याबाबत बोलायला लावले. पावनीदेवी यांनी पोलिसांना सांगितले की, लग्नाच्या एका वर्षानंतर प्रशांतने कंकुकुमारीवर अत्याचार केला आणि ती तिच्या माहेरी परतली. हेही वाचा Peru च्या Amazon Rainforest मध्ये बोटीवर 70 ब्रिटिश आणि अमेरिकन पर्यटक ओलिस; लहान मुलांचाही समावेश

परमारांनीही तिच्या कुटुंबियांना सांगितले होते की, त्यांचा निम्मा खर्च परत केला तरच तिला स्वीकारले जाईल. बरीच विनवणी केल्यानंतर आणि पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परमारांनी तिला परत घेतले पण त्रास सुरूच होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. या वर्षी जुलैमध्ये, प्रशांत कंकुकुमारीला त्याच्या मित्रांसह केदारनाथ आणि हरिद्वारच्या सहलीसाठी घेऊन गेला जिथे तिला कळले की त्याचे प्रेम आहे.

तिने त्याला अफेअर संपवायला सांगितले पण बदल्यात त्याने तिला मारहाण केली. माझ्या मुलीला या छळाला कंटाळून तिला मरावेसे वाटले आणि तिने आपले जीवन संपवले, पावनीदेवीने पोलिसांना सांगितले. अंधेरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संताजी घोरपडे म्हणाले, तक्रारीच्या आधारे आम्ही पतीला अटक केली आहे.