Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

अनैतिक संबंधातून एका महिलेने तिच्या पतीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजस्थान (Rajasthan) येथील बारा (Baran) जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून त्यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत वीट भट्टीचा कामगार कंत्राटदारासोबत कामाला गेला. मात्र, तो घरी न परतल्यामुळे त्याचा भाऊ त्याला पाहण्यासाठी वीट भट्टीवर गेला. त्यावेळी गावकऱ्यांना त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजुला आढळून आला. यानंतर आजूबाजुच्या परिसरातील एकच खळबळ उडाली.

कांतीबाई मीना आणि राकेश मेघवाल असे आरोपींचे नाव आहेत. महेंद्र मीना आणि कांतीबाई हे दोघेही 21 नोव्हेंबरला रात्री वीट भट्टीचा कामगार कंत्राटदार राकेश याच्यासोबत कामासाठी गेला होता. त्यावेळी महेंद्र आणि कांतीबाई यांच्यात भांडण झाले होते. परंतु, त्या दिवशीनंतर महेंद्र घरी परतलाच नाही. यामुळे महेंद्र यांचा भाऊ भरत हा 29 नोव्हेंबरला दहा ते अकरा जणांसोबत त्याचा शोध घेण्यासाठी वीट भट्टीकडे गेले. तेव्हा रस्त्याच्या बाजूला दुर्गंधी येत होती. याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, महेंद्रचा मृतदेह आढळून आला. हे देखील वाचा- Odisha Rape: लज्जास्पद! ओडिशा येथे 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; 87 वर्षाच्या व्यक्तीला अटक

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी महेंद्रची पत्नी आणि राकेशची कसून चौकशी केली. त्यावर त्यांनीच महेंद्रची हत्या केली, अशी कबुली दिली. कांतीबाई आणि राकेश यांच्यात गेल्या सात वर्षांपासून अनैतिक संबंध होते. यातून त्यांनी महेंद्रची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी महेंद्रची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह वीटाच्या ढिगाऱ्याजवळ टाकून तेथून पळ काढल होती, अशी माहिती एका इंग्रजी बेवसाईटने दिली आहे.