Wife Burns Husband Private Parts With Cigarette: धक्कादायक! पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टला दिले सिगारेटने चटके; आरोपी पत्नीला अटक
Cigarette प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Wife Burns Husband Private Parts With Cigarette: बिजनौर जिल्ह्यातील सेओहारा येथे एका महिलेने पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य केलं आहे. पत्नीने पतीचे हात-पाय बांधून त्याच्या प्रायव्हेट पार्टला (Private Parts) सिगारेट (Cigarette) ने चटके दिले. एवढेच नाही तर चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचाही प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पतीवर गंभीर अवस्थेत उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत.

पत्नीच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील चक महदूद सानी येथील रहिवासी उस्मान जैदी यांचा मुलगा मन्नान जैदी याने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, 17 नोव्हेंबर रोजी शफियााबाद सेओहारा गावातील रहिवासी मयत खुर्शीद अहमद यांच्या मुलीशी त्याचे लग्न झाले होते. (हेही वाचा -Nair Hospital Staffer Suicide Video: नायर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याची उडी मारून आत्महत्या, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल)

लग्नानंतर पत्नीच्या सांगण्यावरून तो कुटुंबापासून वेगळा झाला आणि भाड्याच्या घरात राहू लागला. पत्नीचे चारित्र्य चांगले नसल्याचे लग्नानंतर त्याला समजले. ती दारू, सिगारेट इ.चे सेवन करत होती. पत्नी त्याच्याशी वाद घालून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागली. तसेच पत्नी पतीला मारण्याचा कटही रचत होती, असा देखील आरोप करण्यात आला आहे. (हेही वाचा - Indian Student Death in Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या; हरियाणामध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनी केली सरकारकडे मदतीची मागणी)

प्राप्त माहितीनुसार, 29 एप्रिल 2024 च्या रात्री त्याची पत्नी त्याच्याकडे आली. तिने आपल्या पतीला दुधात काही मादक पदार्थ मिसळून त्याला प्यायला लावले. जेव्हा तो अस्वस्थ झाला तेव्हा तिने त्याचे हात-पाय बांधून क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने तिने त्याचे हात बांधले तसेच चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी महिलेने पतीच्या अंगावर अनेक ठिकाणी सिगारेटने चटके दिले.

पीडिते व्यक्तीने सांगितले की, हा सर्व प्रकार होत असताना तो रडत आणि ओरडत होता. परंतु त्याच्या पत्नीला त्याची दया आली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. दुसरीकडे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस अधिकारीही चक्रावले. पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.