Nair Hospital Staffer Suicide Video: नायर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याची उडी मारून आत्महत्या, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
Nair Hospital Staffer PC TWITTER

 Nair Hospital Staffer Suicide Video:  नायर रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. टोपोज प्लाजाच्या बिल्डींगच्या 15 व्या मजल्यावरून तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उडी मारल्यानंतर नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं परंतु रुग्णालयात नेण्याच्या आधीच मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर परिसरात शांतता पसरली आहे. (हेही वाचा- स्टंटबाजी बेतली जीवावर! दाभोसा धबधब्यावर 120 फूट खोल डोहात उडी मारल्याने पर्यटकाचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित किशोर गुरभानी (33) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. रोहित गेल्या काही वर्षांपासून नायर रुग्णालयात काम करत होत. नायर रुग्णालयात रेजिस्टर असिस्टंट म्हणून कार्यरत होता. ज्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली ती इमारत हॉस्पिटल कर्मचाऱ्या निवासीस्थान होते. संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याने उडी मारली. उडी मारल्यानंतर नागरिकांनी तात्काळ माहिती आग्रीपाडा पोलिस ठाण्यात देण्यात आली.

त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रोहित हा गेल्या आठ वर्षापासून सिझोफेनियाचा आजारावर उपचार घेत होता. नुकतच त्याला निवडणूक कामासाठी नियुक्त केलं होते. आग्रीपाडा पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली आहे. रोहितने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहे. या घटनेनंतर नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.