Injures Leopard (Photo Credits: ANI)

कधी सार्वजनिक ठिकाणी एखादी घटना घडली की वाऱ्याच्या वेगाने सर्वांच्या नजरा त्याकडे रोखल्या जातात. मागील काही काळात या नजरांची जागा कॅमेऱ्याने घेतली आहे, काहीही झालं की प्रत्येक जण आपल्या हातात मोबाईल घेऊन जमेल तो क्षण जमेल टिपण्याचा प्रयत्न करतात. पण असं करणं पश्चिम बंगाल मधील एका व्यक्तीला चांगलंच अंगाशी आलं आहे. झालं असं की, अलीपुरद्वार या परिसरात एक जखमी बिबट्या शेतातील गवतात पडून होता. बहुदा शरीरावर जखमा झाल्याने तो शेतात आराम करत होता. साहजिक शेतात पडलेल्या आजूबाजूची मंडळी तिथे जमून त्याला पाहत होती. इतक्यात एकाने आपलय मोबाईल मध्ये बिबट्याचे फोटो काढायला सुरुवात केली. पण इतकी गर्दी पाहताच हा बिबट्या गांगरून गेला आणि त्याने चक्क या फोटो काढणाऱ्यावर झडप घातली. हा संपूर्ण प्रकार एका अन्य कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओ मध्ये बिबट्याने फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करताच या व्यक्तीने थेट पळ काढला, मात्र तरीही त्या पळापळीत व्यक्तीच्या हातावर बिबट्याने वार केला ज्यात त्याला किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर त्याला तातडीने लगतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा व्यक्ती पळून जाताच बिबट्याने इतरांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वानी तिथून पळून जात आपला जीव वाचवला. मात्र तरीही गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहा व्हायरल व्हिडीओ

(Leopard spotted in Thane: ठाण्यातील सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये सापडला बिबट्या; जेरबंद करण्यात यश (Video)

दरम्यान, घडलेल्या या प्रकरणानंतर बिबट्याला सुद्धा वनविभागाने उपचारासाठी पकडले आहे, उपचार पूर्ण होताच त्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येईल असे सांगण्यात आले आह .