leopard In Thane (Photo Credits: Youtube)

ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या (Leopard) दिसल्याने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कोरम मॉलच्या (Korum Mall)  सीसीटीव्ही फूटेजमध्ये बिबट्या फिरताना दिसला. तर तो बिबट्या नसून मोठी मांजर असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र अखेर सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बिबट्या सापडला आहे. बेसमेंटमधील एका खोलीत या बिबट्याला अडकवून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्याचे वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अखेर सहा तासांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

मंगळवारी (19 फेब्रुवारी ) च्या रात्री कोरम मॉलमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये बिबट्या दिसला. त्यानंतर मॉलच्या पार्किंग भागात तो फिरताना दिसला. आज (बुधवार, 20 फेब्रुवारी) पहाटे 5:30 च्या सुमारास मॉलच्या सुरक्षा भिंतीवरुन बाहेर पडताना सुरक्षा रक्षकांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी वन विभागाला ही माहिती दिली. ठाण्यात कोरम मॉल नजीक परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या बातमीने स्थानिकांमध्ये दहशत, वन विभागाकडून शोध सुरू (Video)

सकाळपासूनच या वर्दळीच्या परिसरात बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर बिबट्याला सापडला असून त्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.