Weather Update: जून महिना अर्धां संपला तरीही वर्षा ऋतूचे आगमन झाले नाही. वाढत्या उष्णतेने लोकांचा जीव कासाविस झाला आहे. भारतात अजूनही काही भागात विशेषता काही क्षेत्रात तीव्र उष्णतेची लाट उसळते. उत्तर भारतात उष्णेतेचा कहर माजला आहे. त्यामुळे मुलांच्या उन्हाळी सुट्टी वाढवण्याबाबत राज्य सरकारला आवश्यक ती कारवाई करण्यास प्रवृत्त केले आहे. भारतीय हवामान शास्त्राने (IMD) तीव्र उष्णते बाबत चेतावणी जारी केली आहे. तीव्र उष्णतेची लाट येत्या काही दिवसांपर्यंत राहण्याची संभावना आहे. ह्या तीव्र उष्णते पासून स्वत: चे योग्य ते रक्षण करण्यास भारतीय हवामानशास्त्राने सुचवले आहे.
कोणकोणत्या राज्यात तीव्र उष्णता असल्याची शक्यता ?
छत्तीसगड - येत्या तीन दिवसांत छत्तीसगड राज्यात तीव्र उष्णतेची लाट उसळणार आहे, त्यामुळे शक्य असल्यास दुपारचे बाहेरील काम टाळावे. ही परिस्थिती भयावह असेल त्यामुळे स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. असे भारतीय हवामान शास्त्राने सांगितले आहे.
झारखंड- पुढील काही दिवस राज्यात अति उष्णतेची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. झारखंडच्या राज्य सरकारने 8 वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना 21जून पर्यंत सुट्टी घोषित केली आहे.
ओडिसा- राज्यात काही दिवसांपर्यंत तीव्र उष्णता असेल असे भारतीय हवामान खात्याने घोषित केले आहे. हवामान खात्यांच्या अंदाजानुसार तेलंगणा राज्यात काही भागात बुधवार पर्यंत उष्णता असेल.मध्य प्रदेशात देखील येते काही दिवस कडक उन्हाचे असल्याचे सांगितले आहे.
आध्रंप्रदेश- राज्यात पुढील 2 ते 3 दिवस अति उष्णता असेल, अशी माहिती सादर करण्यात आली आहे. बिहार मध्ये उष्णतेची लाट जाणवेल. भारतातील पुर्वे कडील राज्यात गेल्या काही दिवसांपासून 44 लोकांचे मृत्यू तीव्र उष्णतेने झाल्याचे अहवाल समोर आले आहे. ह्या चिंताजनक परिस्थितीमुळे पटना शहरातील शाळा येत्या 24 जून पर्यत बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.