Weather Forecast Tomorrow: मान्सूनचे वेळेपूर्वी आगमन झाल्याने देशभरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर-पूर्वेसह डोंगराळ राज्यांमध्येही पावसाने कहर सुरू केला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) उद्याचा म्हणजेच 9 जुलैचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्यानुसार, पूर्व उत्तर प्रदेशात 10 आणि 11 जुलै, पश्चिम उत्तर प्रदेशात 11 जुलै, बिहारमध्ये 10 ते 12 जुलै, पूर्व मध्य प्रदेशात 10 आणि 11 जुलै, पश्चिम मध्य प्रदेशात 9 आणि 11 जुलै, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 8 आणि 12 जुलै रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 9 आणि 12 जुलै रोजी कोस्टल कर्नाटकात, 9, 11 आणि 12 जुलै रोजी कोकण आणि गोवा, 9 जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, 9, 11 आणि 12 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा: PM Modi Russia Visit: पंतप्रधान मोदी रशियाला रवाना; मोदी-पुतिन भेटीमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये वाढला तणाव, वाचा सविस्तर
जाणून घ्या, कसे असणार उद्याचे हवामान
स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीनेही उद्याचे हवामान म्हणजेच ९ जुलैचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, पुढील २४ तासांत उत्तर-पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड, कोस्टल कर्नाटक, कोकण आणि गोवा, दक्षिण ओडिशा, केरळ आणि किनारपट्टी आंध्र प्रदेशच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, ईशान्य भारत, झारखंड, राजस्थान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हरियाणा, पंजाब, दिल्ली, लडाख, रायलसीमा, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.