
Weather Forecast Today: राज्यात उष्णतेच्या झळा तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात अधिक तापमान राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात तापमानात 1-2 अंशांनी वाढणार आहे. 1 मार्च रोजी मुंबई आणि अहमदाबाद येथे अनुक्रमे 28.4 आणि 31.3 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. शुक्रवारी राज्यात मुंबईत 38.4 अंश सेल्सियस तापामानाची सर्वााधिक नोंद झाली. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी (28 फेब्रुवारी) राज्यात प्रचंड तापमान नोंदवले गेले. दरम्यान, दिल्ली वगळता बहुतेक प्रमुख भारतीय शहरांमध्ये तीव्र उष्णता, काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असेल, जिथे हलक्या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळू शकतो. कोलकाता आणि चेन्नईमध्ये आकाश स्वच्छ राहील आणि तापमान 28.3 ते 28.7 अंश सेल्सिअस राहील.
बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये तापमान अनुक्रमे 26.4 आणि 30.5 अंश सेल्सिअस राहील. राज्यातील तापमान पहिले तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अकोल्याचा पाराही 38 अंश होता. विदर्भात 36-38 अंशांपर्यंत तापमान असणार आहे. दरम्यान, दिल्लीत हलका पाऊस पडेल आणि थंड तापमान 22.7 अंश सेल्सिअस राहील. एकंदरीत, दिल्ली वगळता अनेक ठिकणी नागरिकांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्रात तापमानाचा पारा आणखीन वाढणार असून कोकण गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नाही.