Watch Video: कानपूर येथील गंगा घाटच्या पायऱ्या चढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाय घसरून पडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारी कानपूर (Kanpur) येथे राष्ट्रीय गंगा परिषदेच्या पहिल्या बैठकीस उपस्थित होते. यात नमामि गंगे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील व नवीन कृती आराखड्यावर चर्चा झाली. दरम्यान नरेंद्र मोदींना एका किरकोळ समस्येला सामोरे जावे लागले. कानपूर येथील गंगा घाटच्या पायऱ्या चढत असताना नरेंद्र मोदी पाय घसरुन पडले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यासह असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले. सुदैवाने, नरेंद्र मोदी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) उपस्थित होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओ -