Vistara 5th Anniversary Offer: 14,555 रूपयांत International तर 995 रूपयांमध्ये Domestic विमान प्रवासाची संधी; 10 जानेवारी पर्यंत बूक करू शकता तिकिटं!
Vistara (Photo Credits: Twitter)

एअरलाईन्स कंपन्यांमध्ये एक प्रतिष्ठित कंपनी Vistara आपल्या 5व्या वर्षपूर्तीनिमित्त आपल्या ग्राहकांसाठी तिकिटांमध्ये विशेष ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये केवळ 995 रुपयांत तुम्हाला विमान प्रवास करता येणार आहे. या ऑफरमध्ये देशांतर्गत प्रवासासाठी 995 पासून तिकिट विक्री सुरु झाली असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 14,555 रुपयांपासून तिकिटविक्री होत आहे. मात्र ही ऑफर केवळ 48 तासांपर्यंत मर्यादित असून 10 जानेवारीला मध्यरात्री ही ऑफर बंद होईल. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांचा याचा लाभ घ्यावा असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

आपल्या वर्षपूर्ती निमित्त विस्तारा ने ही खास ऑफर ठेवली आहे. यात त्यांनी आपल्या तिकिटांमध्ये जबरदस्त सूट दिली आहे.

हेदेखील वाचा- जगप्रसिद्ध S7 Airlines कंपनीच्या Co-Owner नतालिया फिलेव यांचे विमान अपघातात निधन

यात देशांतर्गत प्रवासासाठी इकॉनॉमी क्लास साठी 995 रुपये, प्रीमिअम इकॉनॉमी साठी 1,995 रुपये आणि बिझनेस क्लाससाठी 5,555 रुपयांपासून तिकिटविक्री सुरु झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी इकॉनॉमी क्लास 14,555 रुपये, प्रीमिअम इकॉनॉमी 19,995 तर 35,555 रुपये बिझनेस क्लाससाठी तिकिटविक्री सुरु झाली आहे.

ही ऑफर सुरु झाली असून 10 जानेवारीला मध्यरात्री ही ऑफर बंद होईल. तसेच ही ऑफर केवळ 25 जानेवारी आणि 30 सप्टेंबर 2020 दरम्यान असेल.

या ऑफरमध्ये मुंबई-दिल्ली विमान तिकिट कमीत कमी 2,955 रुपये तर मुंबई-गोवा तिकिट 1995 रुपयांपासून सुरु होत आहे. तर दिल्ली-बंगळूरू विमान प्रवास 3,355 रुपये आणि मुंबई-बंगळूरू 2,055 रुपये असेल.