Viral Video Ragging: सरकारी कॉलेजमध्ये रॅगिंगचा व्हिडिओ व्हायरल, 7 विद्यार्थ्यांवर कारवाई, वर्षभरासाठी महाविद्यालयात प्रवेश बंदी (Watch Video)
Ragging Video (photo Credit - Twitter)

मध्यप्रदेश (MP) रतलाम येथील मेडिकल कॉलेजमधील (Govt College) रॅगिंगचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video Ragging) झाल्यानंतर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर (Student) कारवाई करण्यात आली आहे. 28 जुलै रोजी रॅगिंगची घटना घडली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांना एका रांगेत उभे करण्यात आले आणि नंतर त्यांना कानी खाली मारण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलचे वॉर्डन डॉक्टर अनुराग जैन यांनीही याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी रात्री 7 विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक सुरेशकुमार शिंदे यांनी दिली आहे.

या विद्यार्थ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 323 आणि 341 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एएसआयने सांगितले. कॉलेजचे डीन डॉ जितेंद्र गुप्ता म्हणाले, "सर्व विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. (हे देखील वाचा: Viral Video: एक विवाह ऐसा भी? 30 वर्षापूर्वीचं निधन झालेल्या वधु वराचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा, पहा व्हिडीओ)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही सीनियर विद्यार्थी ज्युनिअर्सना जबरदस्तीने रांगेत उभे राहण्यास भाग पाडत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांना काना खाली मारली जाते. रॅगिंगची माहिती मिळताच वॉर्डन तेथे पोहोचला असता त्याच्यावर बाटलीही फेकण्यात आली.