Priyanka Gandhi (PTI)

काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या ताफ्याला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हापूर रोडवर (Hapur Road) प्रियंका गांधी यांच्या ताफ्यात सामील झालेल्या चार वाहनांची टक्कर झाली. या अपघातानंतर प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले सुदैवाने, या अपघात कोणतीही जीवतहानी झाली नसून प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस अन्य कार्यकर्ते सुरक्षित आहेत. प्रियंका गांधी या प्रजासत्ताक दिनी शेतकरी टॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या अपघातात मरण पावलेल्या तरूणाच्या शोकसेभेसाठी रामपूरला निघाल्या आहेत.

टाईम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी या रामपूरच्या दिशेने जात असताना त्याच्या वाहनाच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. ज्यामुळे वाहनचालकाने ब्रेक दाबून गाडी थांबवली. ज्यामुळे पाठीमागून येणाऱ्या त्यांच्याच ताफ्यातील वाहनांची धडक झाली आहे. मात्र, प्रियांका गांधी या सुखरुप आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Farmers Protest Delhi: राकेश टिकैत यांचा इशारा, केंद्र सरकारचे कुंपन, भाजप मित्रपक्षांचा सल्ला ते विरोधकांचा हल्ला; शेतकरी आंदोलनाबाबत 5 महत्त्वाचे मुद्दे

एएनआयचे ट्विट-

26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान ट्रॅक्टर पलटून नवरीत सिंह (वय, 27) या तरुणाचा मृत्यू झाला होता. आयकर कार्यालयाजवळ हा अपघाता घडला होता. ज्यामुळे नवरीत सिंह यांच्या शोकसभेत सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास रामपूरला निघाल्या होत्या.