Farmers Protest Delhi: राकेश टिकैत यांचा इशारा, केंद्र सरकारचे कुंपन, भाजप मित्रपक्षांचा सल्ला ते विरोधकांचा हल्ला;  शेतकरी आंदोलनाबाबत 5 महत्त्वाचे मुद्दे
Shiv Sena On Farmers Protest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे (Farm Laws 2020) मागे घ्यावेत यासठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आक्रमक आहेत. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers' Protest) सुरु आहे. आंदोलकांना अडचणीत आणण्यासाठी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून केंद्र सरकारने राबविलेल्या उपाययोजना आणि पोलिसांकडून होणारे वर्तन यांमुळे विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. यावरुन शेतकरी आंदोलनाचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केंद्र सरकारला सूचक इशारा दिला आहे. मित्रपक्षांनी भाजपला सल्ला दिला आहे. पंजापचे मुख्यमंत्री आणि विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधीत हे पाच महत्त्वाचे मुद्दे.

तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढणार- राकेश टिकैत

केंद्र सरकारने कृषी कायद्याविरुद्ध राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी येत्या 6 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. भारत बंदपूर्वी भारतीय किसान यूनियन (BKU) चे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे की, जर केंद्र सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही. तर या वेळी शेतकरी 40 लाख ट्रॅक्टर घेऊन रॅली काढतील.

पोलिसांनी रस्त्यांवर उभारले बॅरीकेट्स, ठोकले खिळे

गाजीपूर, सिंघू आणि टिकरी या दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेला आंदोलनस्थळी पोलिसांनी शेतकरी आंदोलन परिसराला जोडणाऱ्या मार्गांवर अडथळे निर्माण केले आहेत. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी रस्त्यांवर खिळे ठोकले आहेत. प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

आंदोलनस्थळी पाणीपुरवठा खंडीत, शौचालयांचीही अडचण

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटींग करुन रस्ते अडवले आहेत. रस्त्यांवर खिळे ठोकले आहेत. इतकेच नव्हे तर शतकरी आंदोलन स्थळी 10 पोर्टेबल टॉयलेट्सचा पाणीपुरवठा खंडीत करण्या आला आहे. त्यामुळे आंदोलकांना आपल्या नैसर्गिक विधींसठीही अडचणी निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजप मित्रपक्षांचा केंद्र सरकारला सल्ला

कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावरुन भाजप मित्रपक्षांनीही केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. भाजपसोबत बिहारमध्ये सत्तासहभागी असलेल्या जनतादल युनायटेडने म्हटले आहे की, मोदी सरकारने शेतकऱ्यांप्रती नरमाीचे धोरण स्वीकारावे.

अमरिंदर सिंह यांनी दिली ऑपरेशन ब्लू स्टारची आठवण

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शेतकरी आंदोलकांच्या प्रश्नावर एक सर्वपक्षीय बैठक घेतली. यात त्यांनी म्हटले की, हा वाद लवकरच संपायला हवा. या वेळी त्यांनी 1984 मध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचीही आठवण करुन दिली.