लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत; 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स'ने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव
Supreme Court and EVM (Photo Credit - PTI)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2019) निकालातील मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यात तफावत असल्याचा आरोप करत एका संस्थेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स', (Association for Democratic Reforms) असं या संस्थेच नाव आहे. या संस्थेने सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्याही निवडणुकीचे निकाल जाहीर करतांना मतांच्या आकडेवारीचा योग्य ताळमेळ घालण्यात यावा. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतांच्या आकडेवारीत झालेल्या गोंधळाचा तपास करावा, अशी विनंती केली आहे. (हेही वाचा - Maharashtra Assembly Election 2019: ईव्हीएमवरील कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळालाच! साताऱ्यातील नवलेवाडी गावातील धक्कादायक प्रकार)

या संस्थेच्या याचिकाकर्त्यांसोबत तज्ज्ञांच्या पथकाने विविध निवडणूक क्षेत्रातील एकूण मतदान आणि मतमोजणीतील मतदानाची आकडेवारी यांची पडताळणी केली आहे. या पथकाने 28 आणि 30 जून रोजी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळावरील आकडेवारी आणि 'माय व्होटर्स टर्नआऊट' अ‍ॅपवरील आकडेवारीची पडताळणी केली आहे. या पडताळणीत दोन्ही आकडेवारीत एकूण 542 मतदारसंघांपैकी 347 मतदारसंघातील मतदान व मतमोजणीच्या आकडेवारीत 1 लाख 1 हजार 323 मतांची तफावत होती. तसेच यातील 6 मतदारसंघात उमेदवाराच्या विजयाच्या आकडेवारीत आणि झालेल्या एकूण मतदानाच्या आकडेवारीत अधिक तफावत होती.

हेही वाचा - EVM मशीनमध्ये घोटाळा? तुमचे मत जर दुसऱ्या पक्षाला गेले, तर ताबडतोब करा या गोष्टी

गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने बॅलेटपेपरद्वारेच मतदान घेतलं पाहिजे, अशी मागणी अनेकदा निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक पक्षांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 370 लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचा दावा केला होता.