Nainital Bus Accident: उत्तराखंड नैनिताल शहरात रविवारी 32 प्रवासी असलेली बस दरीत कोसळली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आणि 18 जखमी झाले. राज्य अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांनी जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. नैनितालमधील कालाधुंगी रोडवर जात असताना ही घटना घडली. नैनितालमधील आपत्ती नियंत्रण कक्षाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला (SDRF) सतर्क केले. त्यांनी घटनास्थळी जावून प्रवाशांना वाचवले.
30 ते 32 लोक या बसमध्ये प्रवास करत होते. त्यापैकी 25 जण वाचले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणा राज्यातील हिसारहून शाळेय स्टाफ बसमधून नैनीताल फिरण्यासाठी आला होता. परत जाताना त्यांची बस दरीत कोसळली. या भीषण अपघातात एक महिला आणि एका मुलासह तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही बस कालाढूंगी रोडवर नालनीमध्ये खोल दरीत कोसळली. पोलीसांनी घटनेची माहिती घेत मृत्यूंची नोंद घेतली आहे.