Pune Gas Tank Blast: पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये रविवारी स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेच तब्बल ९ गॅस टाक्यांचा स्फोट झाला आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना गॅस चोरीचा काळाबाजार करत असताना ही घटना घडली. ताथवडे शहारात हा स्फोट झाला आहे. या घटनेत नागरिकांना फार गोंधळ सुरु झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जवळी शाळेतील तीन वाहनाना आग लागून जळून खाक झाली आहेत. आग रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास लागली.
मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी ताथवडे परिसरात गॅस टाकीचा काळाबाजार करत असताना, अचानक गॅसचा स्फोट झाला. या भीषण आगीत शाळेतील तीन बस आगीत जळून खाक झाल्या. एकामागोमाग एक स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांचा फार गोंधळ उडाला. नागरिकांनी घराबाहेर धाव घेतला. आगीचा स्फोट पाहून काळाबाजार करणाऱ्यांनी देखील घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने याघटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशमन दालाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. भीषण आग एका ते दीड तासांनंतर आटोक्यात आली. दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधण्याचे काम सुरू केले आहे.