Uttar Pradesh Crime: खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला, मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली; उत्तर प्रदेशमधील घटना
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी (Uttar Pradesh Crime) वाढत आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून मुलाने वडिलांच्या हत्येचा (father murder)कट रचल्याची घटना सोमर आली आहे. वडिलांना मारण्यासाठी मुलाने(son) तिघांना सुपारी दिली होती. त्यासाठी त्याने आरोपींना सहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यातले दीड लाख रुपये देखील दिले होते. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. वडील खर्चासाठी मागेल तेवढे पैसे देत नव्हते त्यामुळे मुलाने त्यांना संपवण्याची योजना आखल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (हेही वाचा :Uttar Pradesh Crime: हुंड्याच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, संतापलेल्या माहेरच्यांनी पेटवले सासरचे घर; होरपळून दोघांचा मृत्यू )

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. गुरुवारी हत्येची घटना घडली. व्यावसायिक मोहम्मद नईम असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बंदूकेनी गोळी मारुन हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पियुष पाल, शुभम सोनी आणि प्रियांशु यांना अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, नईम यांच्या हत्येसाठी त्यांच्या मुलाने सुपारी दिली होती. (हेही वाचा:Dombivili Crime: भाडे देण्याच्या वादातून डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण )

"खर्चासाठी वडील मनासारखे पैसे देत नव्हते म्हणून मुलगा त्यांच्यावर नाराज होता. आरोपी मुलगा त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुकानातून पैशांची आणि घरातून दागिन्यांची चोरी करायचा. या आधीदेखील त्याने याच कारणावरुन वडिलांच्या हत्येचा कट रचला होता पण त्यामध्ये त्याला यश आलं नाही," अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे. तर अल्पवयीन मुलाला बालगृहात पाठवण्यात आले आहे. "अल्पवयीन मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली होती. यासाठी तो सहा लाख रुपये देणार होतो. हत्येआधी दीड लाख रुपये दिले होते. वडिलांच्या हत्येनंतर उरलेली रक्कम त्यांना देणार होतो," असे पोलिसांनी सांगितले.