Uttar Pradesh Crime: हुंड्याच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, संतापलेल्या माहेरच्यांनी पेटवले सासरचे घर; होरपळून दोघांचा मृत्यू
Uttar Pradesh Crime News PC TWITTER

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशात येथे विवाहित महिलेने सासरच्या माणसांच्या कंटाळून आत्महत्या (Suicide)  केली या गोष्टीचा राग मनात धरत मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्या घराला पेटवले. या घटनेत दोन जण जिंवत जळाले आहेत. ही घटना शहारातील प्रयागराज मुठ्ठीगंज येथील आहे. आगीतून इतर पाच जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा- बेंगलुरू मध्ये खाजगी शाळेजवळ सापडली Gelatine Sticks, Detonators सह स्फोटकं)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (18) मार्च रोजी रात्री उशिरा घडली आहे. अंशिका केसरवाणी या विवाहित महिलेने आत्महत्या केल्यानंतर तिच्या संतप्त पालकांनी तीचे सासरचे घर पेटवून दिले. या धक्कादायक घटनेमुळे अंशिकाची सासू आणि सासरे या दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शोभा देवी आणि राजेंद्र केसरवाणी यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

आगीची माहिती पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिस आले. त्यांनी आगीत अडकलेल्या इतर पाच जणांची सुटका केली. अंशिकाने आत्महत्या नाही तर तीचा खून सासरच्या मंडळींनी केला असा आरोप केला आणि त्यानंतर माहेरच्या मंडळींनी टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिस ठाण्यात महिलेने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळानंतर संतापलेल्या माहेरच्या मंडळींनी सासरचे घर पेटवले. ही घटना रात्री ११ वाजता घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने इतर पाच जणांना वाचवण्यात आले आहे. आग विझवल्यानंतर रात्रीचे तीन वाजता बचाव कार्यांनी दोन मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या थरारक घटनेनंतर परिसरत हादरले आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. सासरचे महिलेचा हुंड्यामुळे छळ केल्याचे समोर येत आहे.