
Lucknow News: लखनऊ शहरातील रहिमाबाद भागात एका टॅक्सी चालकावर त्याच्या मित्राने गोळ्या घालून जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघेही एकाच मुलीवर प्रेम करत असल्याचे या घटनेतून निष्पण झाले आहे. पोलिसांनी या घटनेअंतर्गत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या घटनेची तपासणी सुरु केली आहे. विनय द्विवेदी असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात विनय द्विवेदी यांच्या खांद्यावर गोळी लागली, सद्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी ते धोक्याबाहेर असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती होताच, विनय यांचा मोबाईल फोन तपासल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केले आहे. चौकशीतून दोघेही एकाच महिलेवर प्रेम करत असल्याचे निष्पण झाले. ते त्याला माघार घेण्यास सांगत होते. विनय यांचं महिलेसोबत शारिरिक संबंध सुरु असल्याचे विकास कुमार याला समजले. त्यावेळी विकासने विनयसला मारून टाकण्याचे ठरवले,
कुमारने त्याचा मित्र महेंद्र याच्याकडे विनयला मारून टाकण्याची मदत मागितली आणि दोघांनी बुधवारी रात्री अकराच्या सुमारास रहिमाबाद रेल्वे स्थानकाजवळील जंगल परिसरात द्विवेदीवर गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. द्विवेदी यांनी आपल्या मित्रांना फोन केला ज्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांना केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये नेले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.