India’s Largest Milk Producer State: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य (India’s Largest Milk Producer State) ठरले आहे. उत्तर प्रदेशने एका वर्षात 38.78 दशलक्ष टन दूध उत्पादन करून विक्रम प्रस्थापित केला आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशात दररोज 1,062.47 लाख लिटर दूध उत्पादन होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार अवनीश कुमार अवस्थी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, राज्यात दरवर्षी 19.39 दशलक्ष टन किंवा दररोज 531.23 लाख लिटर दूध विक्रीयोग्य आहे. संघटित क्षेत्रात दरवर्षी 3.35 दशलक्ष टन म्हणजेच दररोज 91.78 लाख लिटर दूध प्रक्रिया केली जाते.
खाजगी कंपन्यांकडून दररोज 84.52 लाख लिटर दुधावर प्रक्रिया -
संघटित क्षेत्राद्वारे दररोज उत्पादित होणाऱ्या 91.78 लाख लिटर दुधापैकी, PCDF ने दररोज 7.26 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली आहे. तर अमूल, मदर डेअरी आणि इतर खाजगी कंपन्यांनी दररोज 84.52 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली आहे. त्याच वेळी, असंघटित क्षेत्राने मोठ्या प्रमाणात दुधावर प्रक्रिया केली आहे. त्यांनी दरवर्षी 16.04 दशलक्ष टन म्हणजेच दररोज 439.45 लाख लिटर दूध व्यवस्थापन केले आहे. (हेही वाचा - Asia's First Breast Milk Bank at Sion Hospital: मुंबई येथील सायन रुग्णालात 'ब्रेस्ट मिल्क' बँकेद्वारे 10,000 नवजात बालकांना दूध पुरवठा)
उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य -
दरम्यान, अवनीश कुमार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य बनले आहे. हे रेकॉर्ड उत्तर प्रदेश सरकारच्या दुग्ध क्षेत्राला बळकटी देण्याच्या आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या वचनाचे प्रतिबिंबित करते.'
#UttarPradesh has emerged as India’s largest #milk producer, achieving a record 38.78 million tonnes annually (1,062.47 lakh litres daily) under the visionary leadership of Honble CM Shri @myogiadityanath ji, With a marketable surplus of 19.39 million tonnes annually (531.23 lakh… pic.twitter.com/n21Ojw6HTr
— Awanish K Awasthi (@AwasthiAwanishK) January 12, 2025
दूध उत्पादनात हे राज्य आघाडीवर -
उत्तर प्रदेशनंतर राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात आणि पंजाब ही देशातील सर्वात जास्त दूध उत्पादक राज्ये आहेत. भारत जागतिक दूध उत्पादनापैकी 24 टक्के दुध उत्पादन करणारा देश आहे. तथापी, अमूल ही भारतातील सर्वात मोठी दूध कंपनी आहे.