Hindenburg Research Shares Cryptic Post: वर्षभरापूर्वी अदानी ग्रुपचे(Adani Group) प्रमुख गौतम अदानी यांचे साम्राज्य हादरवून सोडणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आज पुन्हा ट्विट(Hindenburg Research X Post) करत सर्व भारतीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'भारतात लवकरच मोठ्या घडामोडी घडतील', अशा आशयाचे ट्विट अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने(Hindenburg Research) केले आहे. त्यामुळे आता कोणती कंपनी निशाण्यावर आहे? काय होणार आहे? शेअर बाजार कोसळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एका भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा होणार असल्याचे ते संकेत आहेत. (हेही वाचा: Adani Group And Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्च अहवालाचा अदानी साम्राज्याला धक्का; कायदेशीर कारवाईची शक्यता, शेअर बाजारातही खळबळ )
ट्वीट हे विस्तृत नसल्याने हिंडनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा एका चर्चेत आले आहे. कींबहूना भारतीयांना मोठ्या चिंतेत टाकले आहे. कोणत्यातरी भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा होणार आहे, एवढेच यातून स्पष्ट होत आहे. यामुळे भारतीय उद्योग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. हिंडनबर्गच्या या ट्वीटमुळे शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्गने अदानी समुहाच्या हेराफेरीवरून गौप्यस्फोट केले होते. यामुळे शेअर बाजारात भूकंप झाला होता. यामुळे अदानी जगातील 2 नंबरच्या अब्जाधीश पदावरून थेट 36 व्या क्रमांकावर गेले होते.(हेही वाचा: Gautam Adani on SC Verdict In Hindenburg Case: गौतम अदानी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 'सत्यमेव जयते' म्हणत मानले हितचिंतकांचे आभार! )
हिंडनबर्ग रिसर्च पोस्ट
Something big soon India
— Hindenburg Research (@HindenburgRes) August 10, 2024
यानंतर काही महिन्यांनी पुन्हा अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू लागला होता. अदानी ग्रुपचे बाजारमुल्य 86 अब्ज डॉलरपर्यंत कमी झाले होते. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्चने अदानी समूहावर कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी फसवणूकीचा आरोप केला होता. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी हिंडनबर्गला सेबीने नोटीसही पाठविली होती.