गौतम अडानी (Gautam Adani) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाता. त्यांचा अडानी समूह (Adani Group) हासुद्धा नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research ) नावाच्या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. इतकेच नव्हे तर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शअर्सही मोठ्या प्रमाणावर कोसळले. त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली असून अदानी समूहाकडून हंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया आली आहे. सोबतच संबंधित अहवालाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी चाचपणी सुरु असल्याचेही समूहाने म्हटले आहे.
Hindenburg Research अहवाल कास सांगतो?
हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने 'Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History' या नावाचा संशोधन अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहावर विश्लेषणात्मक टीका मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या अहवालाचे शिर्षक जर मराठीत केले तर त्याचा भावार्त 'जगातील सर्वत श्रीमंत असलेला तिसऱ्या क्रमांकाच व्यक्ती कॉर्पोरेट इतिहासातील कसा घोटाळा आहे.' हा अहवाल सांगतो की अदानी समूह स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीत सामील आहे. या अहवालात कंपनीने फसवणूक केल्याचा थेट आरोप केला आहे. (हेही वाचा, World's Top 10 Rich: जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून Mukesh Ambani बाहेर; Gautam Adani कोणत्या स्थानावर? जाणून घ्या)
अदानी ग्रूपने आरोप फेटाळले
हिंडेनबर्ग ग्रुपने केले सर्व आरोप अदानी ग्रूपने आरोप फेटाळले आहेत. अदानी ग्रुपचे सीएफओ जुगशिंदर सिंग म्हणाले की, 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिसर्चने प्रकाशित केलेला अहवाल छापण्यापूर्वी कंपनीशी संपर्क साधला गेला नाही. किंवा तथ्ये पडताळून पाहण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. या अहवालात अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्यांना कोणताही आधार नाही. या अहवालात अदानी समूहावर लावण्यात आलेले आरोप भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.
अदानी समूहाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न
अदानी समूहाच्या म्हणण्यानुसार हा अहवाल म्हणजे अदानी समूहाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. या अहवालाद्वारे कंपनीच्या आगामी एफपीओचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अदानी एंटरप्रायझेसचा FPO हा आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा FPO असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदारांनी नेहमीच अदानी समूहावर विश्वास ठेवला आहे.
अदानी समूहाकडून कायदेशीर कारवाईचे संकेत
अदानी समूहाने गुरुवारी (26 जानेवारी) सांगितले की ते यूएस-आधारित गुंतवणूक संशोधन आणि शॉर्ट-सेलर कार्यकर्ता फर्म, हिंडेनबर्ग रिसर्च विरुद्ध कायदेशीर कारवाईची शक्यता पडताळून पाहात आहेत. ज्या अहवालाने गौतम अदानी-मालकीच्या समूहावर कर फसवणूक केल्याचा आरोप केला आणि वाढत्या कर्जाबद्दल चिंता व्यक्त केली.
अदानी समूहाचे विधी विभागाचे प्रमुख जतिन जलुंधवाला यांनी दिलेल्या ताज्या प्रतिक्रियेमध्ये प्रसारमाध्यमांकडे म्हटले आहे की, 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिसर्चने प्रकाशित केलेला अहवाल दुर्भावनापूर्ण, खोडसाळ आणि अपूऱ्या संशोधनावर आधारीत आहे. ज्याचा अदानी समूह, आमचे भागधारक आणि गुंतवणूकदारांवर विपरित परिणाम झाला आहे."