अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) आणि पत्नी मेलेनिया (Melania Trump) 'ताजमहल' (Taj Mahal) येथे पोहचले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आपल्या पत्नीसमवेत ताजमहलाची पाहणी करत आहेत. प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहलाला ट्रम्प पहिल्यांदा भेट देत आहेत. डोनाल्ड ट्रप यांना ताजमहलाची माहिती देण्याकरिता त्यांच्यासोबत खास गाईडही देण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांची मुलगी इव्हांका आणि जावईही ताजमहल येथे पोहचले आहेत. ताजमहलाचं सौदर्य पाहून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांना फोटो काढण्याचा मोह आवरता आलेले नाही. डोनाल्ड ट्रम्प आज सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास भारतात आले आहे. त्यानतंर त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. त्यानंतर मोटेरा स्टेडिअमचे उद्धघाटने केले. सकाळी मोटेरा स्टेडिअमवर झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी 'नमस्ते' असं म्हणत सुरूवात केली.
दरम्यान हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतामध्ये आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आम्ही भारताचं आदरातिथ्य कायम लक्षात ठेऊ. पंतप्रधान यांचे भारतासाठीचं दिवस रात्र राबणं स्त्युत्य आहे. एक चहावाला ते भारताचा पंतप्रधान हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. मोटेरा स्टेडियमवरून भारतीयांना संबोधित करताना त्यांनी भारताच्या 'विविधतेमध्ये असलेल्या एकतेचं' कौतुक केले आहे. प्रेमाचा संदेश घेऊन भारतामध्ये आलो आहे, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
Agra: US President Donald Trump and First Lady Melania Trump at the Taj Mahal. pic.twitter.com/DOd4tu8iOQ
— ANI (@ANI) February 24, 2020
Agra: US President Donald Trump and First Lady Melania Trump at the Taj Mahal. pic.twitter.com/jjyrHrC1Yz
— ANI (@ANI) February 24, 2020
Uttar Pradesh: US President Donald Trump's daughter Ivanka Trump and her husband Jared Kushner at the Taj Mahal in Agra. pic.twitter.com/c2zxTQMeZ5
— ANI (@ANI) February 24, 2020
मोटेरा स्टेडिअमवर केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्र्म्प यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचं कौतुक केलं. पुढील पिढ्यांसाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. दहशतवादाविरोधात आम्ही एकत्र लढणार आहोत, असं आश्वासन दिलं आहे.