यूपीएससी परीक्षा (UPSC Civil Services Exam) पास करण्यासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत घेत असतात. मात्र, या परीक्षेची तयारी कशी करावी? किंवा नियोजन चुकल्याने अनेकांच्या वाटेला अपयश येते. दरम्यान, या परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी आयपीएस आधिकारी लक्ष्य पांडे (Lakshay Pandey) यांनी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यूपीएससी स्पर्धकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी कोचिंग क्लासेसच्या तुलनेत सेल्फ स्टडीला अधिक महत्व दिले आहे. तसेच या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी किमान पुस्तके आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करणे, हा सर्वात मोठा मंत्र आहे, असेही ते म्हणाले आहेत.
यूपीएससी परीक्षा पास करणे हे विद्यार्थ्यांच्या अनुभव आणि प्रयत्नावर अवलंबून आहे. ही परीक्षा पास करण्यासाठी गुणवत्ता महत्वाची ठरते. या परीक्षेची तयारी करत असताना स्पर्धकांनी कोचिंग क्लास लावण्याऐवजी ऑनलाईन टेस्टला सबस्क्राईब करायला हवे, असे लक्ष्य पांडे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- PAN-Aadhaar Linking चा आजचा शेवटचा दिवस; incometaxindiaefiling.gov.in साईट डाऊन मग SMSच्या माध्यमातून असे करा पॅन-आधार लिंक
लक्ष्य पांडे यांचे ट्वीट-
Books needed for preparation of UPSC civil services exam.
This is based on my experience. Trick is to read minimum books multiple times .
You can message me about any other doubt as well .☺️#UPSC #books pic.twitter.com/IU3EaMPNuC
— Lakshay Pandey (@lakshay_cop) March 2, 2021
तसेच, यूपीएससी परीक्षा तयारी करणाऱ्या स्पर्धकांनी दररोज 45 ते 60 मिनिटे वृत्तमान पत्र वाचणे गरजेचे आहे. याशिवाय, दररोज 6 ते 8 तास झोपण्याचाही लक्ष्य पांडे सल्ला देतात. त्यांनी दिलेल्या या टीप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी या ट्विटवर कंमेट आणि लाईक्स केले आहेत.