UP Crime: उत्तर प्रदेशातील भदोही येथे एका महिलेचा अर्धा जळलेला मृतदेह (Deathbody) सापडला आहे. हा मृतदेह एका पेटीत सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यू होण्यापूर्वी महिलेसोबत बलात्कार (Rape) झाल्याची अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. राष्ट्रीय महामार्ग 19 वरील लाला नगर टोल प्लाझाजवळ पडलेल्या एका बॉक्समधून काहीतरी जळल्याचा वास येत असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आतमध्ये एका महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी भेट देणाऱ्या भदोहीच्या पोलिस अधीक्षक (एसपी) मीनाक्षी कात्यायन यांनी सांगितले की, मृत महिलेचे वय 20 आहे असा अंदाज पोलीसांनी लावला आहे आणि तिने पांढरा सूट घातला होता. हत्येपूर्वी तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. तिची ओळख पटू नये म्हणून मृतदेह चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचे पोलीसांनी वृत्तांना माहिती दिली.
थाना गोपीगंज अंतर्गत लालानगर टोल प्लाजा के पास अज्ञात लड़की उम्र करीब 20-22 वर्ष का शव झाड़ियों में मिलने पर एसपी भदोही द्वारा मौके का निरीक्षण किया गया। पुलिस द्वारा शव को कब्जे में लेकर शिनाख्त करने सहित आवश्यक विधिक कार्यवाही की जा रही है।
एसपी भदोही की बाईट।@Uppolice pic.twitter.com/CEBhOqZpcL
— BHADOHI POLICE (@bhadohipolice) September 2, 2023
महिलेचे हातपाय दोरीने बांधलेले दिसत आहेत. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहे. महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कात्यायन यांनी सांगितले. खुनापूर्वी बलात्कार झाल्याची शक्यता त्यांनी दर्शवली आहे. या घटनेअंतर्गत सर्वीकडून तपासणी केली जाईल. लवकरच आरोपीला पकडण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.