Kerala Train Fire: केरळ (Kerala) मधील कोझिकोड (Kozhikode)
मध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रविवारी कोझिकोडमध्ये एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यावरून झालेल्या भांडणानंतर एका व्यक्तीने एका प्रवाशाला पेटवून दिले. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत अनेक जण जखमी झाले असून या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
आग लागल्याने अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली. त्यानंतर ट्रेनचा वेग कमी झाल्याने आरोपीने पळ काढला. आरोपींची ओळख पटू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर मृतांची ओळख पटली आहे. या घटनेनंतर रेल्वे परिसरात घबराट पसरली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा - Karnataka Shocker! कर्नाटकातील शिवमोग्गा येथील सरकारी रुग्णालयातून कुत्राने तोंडात धरून नेलं नवजात अर्भक; बालकाचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री 9.45 च्या सुमारास घडली. जेव्हा ट्रेन कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर आली. दरम्यान, ट्रेनमधील सीटवरून दोन लोकांमध्ये भांडण झाले आणि त्या व्यक्तीने दुसऱ्या प्रवाशाला पेटवून दिले. या अपघातात किमान आठ जण भाजले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
Kozhikode, Kerala | Forensic experts reached the spot where the bodies of three people including that of a child were found near a railway track. pic.twitter.com/154A3r3EFU
— ANI (@ANI) April 3, 2023
प्राप्त माहितीनुसार, जेव्हा ट्रेन कन्नूरला पोहोचली तेव्हा काही प्रवाशांनी या घटनेनंतर एक महिला आणि एक मूल बेपत्ता असल्याची तक्रार केली. बेपत्ता लोकांच्या बातम्या समोर आल्यानंतर, ट्रेनची तपासणी केली गेली, जिथे एक महिला आणि एका मुलासह तीन मृतदेह सापडले.