
UP Shocker: उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये नदीत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या तरुणीचा जीव वाचवण्यात आला आहे. एक तरुणी पुलावरून उडी मारत असल्याचे पाहिल्यानंतर अनेक जण तिला वाचवण्यासाठी घटना स्थळी जमले होते. यावेळी लोकांनी तिला पाहिलं आणि तिला असं करण्यापासून रोखलं. हापुडमधील गडमुक्तेश्वर या तीर्थनगरीतील ब्रिजघाट येथे ही घटना घडली आहे. ती उडी मारण्याआधीच लोकांनी तिचा जीव वाचवला. यावेळी एका तरुणाने त्याला धरून ठेवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर @News18India नावाच्या हँडलने शेअर केला आहे. या तरुणीला वाचवण्यासाठी काही लोकांनी खूप प्रयत्न केले. जेव्हा लोकांनी तिला आत्महत्येचा प्रयत्न करताना पाहिले तेव्हा त्यांनी तिला ताबडतोब पुलाच्या दुसर् या बाजूने पकडले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि ते जेसीबीघेऊन पोहोचले आणि त्यानंतर पोलिसांनी तरुणांच्या मदतीने तिची सुटका केली.
नदीत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या तरुणीचा जीव वाचला, पाहा व्हिडीओ
पुलिस ने नाकाम की ख़ुदकुशी की कोशिश | #shorts#upnews #hapur #shorts pic.twitter.com/eeedJSB2bv
— News18 India (@News18India) March 9, 2025
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांकावर मदतीसाठी कॉल करा:
Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.