UP Shocker News: 2 मुलांची आणि पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या, घटनास्थळी सुसाईट नोट; उत्तर प्रदेशातील घटना
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

UP Shocker News: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या पोटच्या दोन मुलांची आणि पत्नीची हत्या केली त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेनंतर संपुर्ण जिल्हा हादरला आहे.  बलिया येथील बांसडीह पोलिस स्टेशन अंतर्गर देवडीह गावात ही घटना घडली आहे. स्वत: झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. श्रवण राम  (35)असं हत्या करून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी शशिकला (30) आणि त्यांची दोन मुले, सात वर्षांचा सूर्य राम आणि चार महिन्यांचा चथू असे मृतांचे नाव आहे. (हेही वाचा- कौटुंबिक वादातून पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टरने केली आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, श्रवणने त्याच्या पत्नीला आणि मुलांनर क्रुरपणे मारहाण केल्याची माहिती रहिवाशाकडून मिळाली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच, श्रवणचे घर आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतल्यानंतर पोलिसांना त्याचा मृतदेह बागेत एका झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना पत्नी आणि मुलांचा बागेत मृतदेह आढळला, मुलांवर धारदाक शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपासणी करताच त्यांना सुसाईट नोट देखील सापडली.

रामच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, राम आणि शशिकला यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून वैवाहिक जीवनांत अडथळे येत होते. त्यांच्या अनेकदा भांडण आणि विवाद होत असायचाय ज्यामुळे त्यांची कोर्टात केस दाखल झाली होती. जवळपास 18 महिन्यांपूर्वी त्यांच्यात विभक्त राहण्यासाठी भांजण झालं होत. भांडण सुरूच राहिल्याने त्यांच्यात वाद वाढत गेला, त्यामुळे ही घटना घडली.  अशी माहिती एसपी यांनी दिली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.