Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलते मुळे एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेत, एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी तिचा मृतदेह बाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलवर फेकून दिला आणि तिचा मृत्यू झाल्याची माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपुर्वी मुलीला ताप आल्यामुळे तीला रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी तीला बर वाटत असल्याचे तीच्या मावशीने पोलीसांत माहिती दिली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे तीचा मृत्यू झाला असा आरोप कुटूंबियांनी केला. रुग्णालयातील डॉक्टरांनी तीचा मृतदेह बाहेर येऊन एका बाईकवर ठेवला तीच्या घरच्यांना न सांगता घटनास्थळावरून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी पळ काढला. ही घटना एका उपस्थित स्थानिकांनी कॅमेरात कैद केली. मृत मुलीच्या कुटूंबियांनी न्यायासाठी मागणी केली आहे.
या घटने अंतर्गत वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रुग्णालय सील करुन टाकले आहे. या रुग्णालयतील आणखी एका रुग्णाचा शस्त्रक्रिया चालू होती, परंतु त्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपुर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.