![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/chhattisgarh-high-court-a-380x214.avif?width=380&height=214)
Unnatural Sex and Court's Verdict: पत्नीच्या संमतीशिवायही पुरुषाने पत्नीसोबत केलेले अनैसर्गिक कृत्य हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, कडून मिळालेल्या माहितीनुसार, बस्तर (जगदलपूर) येथील रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्या पतीने ११ डिसेंबर २०१७ च्या रात्री पत्नीच्या संमतीशिवाय तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले होते. या कृत्यामुळे पीडितेला असह्य वेदना झाल्या आणि नंतर उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या प्रकरणावर असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी एका आदेशात ही टिप्पणी केली आणि आरोपी पतीची भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४, ३७६ आणि ३७७ अन्वये सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आणि त्याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी न्यायालयाने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता आणि सोमवारी (१० फेब्रुवारी) निकाल दिला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली. कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने पतीला कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक कृत्य), ३७६ (बलात्कार) आणि ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवले आणि त्याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पतीने उच्च न्यायालयात अपील केली होती. हेही वाचा: Indias Got Latent Controversy: महाराष्ट्र सायबर पोलिसांची मोठी कारवाई; अश्लील कंटेंट तयार आणि प्रकाशित केल्याबाबत 30 ते 40 जणांविरुद्ध दाखल केला एफआयआर
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने संमतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा झाल्याचा दाखला देत नाही. संमतीने लैंगिक संबंधांच्या बाबतीत भादंविकलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सबंधित खटल्याच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने म्हटले की, जर पत्नीचे वय १५ वर्षांपेक्षा कमी नसेल तर पतीने केलेले कोणतेही लैंगिक संबंध किंवा कृत्य बलात्कार म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत पत्नीची संमती अप्रासंगिक ठरते आणि त्यामुळे अपीलकर्ता पती आयपीसीच्या कलम ३७६ आणि ३७७ अन्वये गुन्हा करत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. त्याचप्रमाणे कनिष्ठ न्यायालयाने आयपीसीच्या कलम ३०४ अन्वये कोणताही विशिष्ट निष्कर्ष नोंदवलेला नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे याचिकाकर्त्या पतीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झाली असून त्याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.