Uttar Pradesh Shocker: 22 व्या मजल्यावरून पडून 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, नोएडा येथील धक्कादायक  घटना
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कान सुन्न करणारी घडना घडली आहे. नोएडामध्ये बुधावारी एका इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून पडून एका शाळेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहर हादरले आहे. मुलाने तणावात आत्महत्या केली असवी असा प्राथमिक अंदाज व्यक्ता केला आहे. पोलिस या पुढील तपासणी करत आहे. हेही वाचा- पुण्यामध्ये बालकामगाराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, 13 मार्च रोजी सांयकाळी 5.30 वाजता पोलिस ठाण्यात 22 मजल्यावरून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असा फोन कॉल आला होता. ही घटना बिसरख ३ ग्रूप हाऊससिंग सोसायटीमध्ये घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. मृत विद्यार्थी सातवीत शिक्षण घेत होता.नोएडा पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्यांची नोंद लिहून घेतली आहे.

मृत मुलाच्या आई वडिलांना विचारपूस केली तेव्हा समोर आले की, दुसऱ्या दिवशी त्याच्या वार्षिक परिक्षेचे रिझल्ट होते. त्याचे आई वडिल दोघे ही संगीत विषयाचे शिक्षक होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या महिन्यात एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. परिक्षा देऊन आल्यानंतर काही तासांत 22 मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवले होते. ही घटना ताजी असताना दुसरी घटना घडली आहे. परिक्षा देऊन आल्यानंतर आत्महत्या का केली हे अद्याप समोर आले नाही.