फ्रीजजवळ विजेचा धक्का बसल्याने 17 वर्षीय बालकामगाराचा (Child labour)
मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी (Pimpari) मधील तळेवडे (Talawade) येथील आहे. टॉवर लाईन मध्ये असलेल्या येवले चहाच्या दुकानात सोमवारी दीडच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली आहे. चिखली पोलिस स्टेशन मध्ये गणेश जगताप या दुकान मालकाच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे गणेश यांनी 17 वर्षीय मुलाला म्हणजेच बालकामगाराला कामावर ठेवले होते. दुकानात फ्रीजच्या बॉडीमधून करंट जात असल्याचं गणेशला ठाऊक होते. त्याने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही त्यामुळे हा करंट लागल्याचा दावा करण्यात आला आहे. गणेश जगतापने फ्रीजच्या दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले. हा प्रकार एका मुलाच्या जीवावर बेतला. मृत मुलाचे वडील प्रेमकुमार बनसोडे यांनी पोलिसात तक्रार केली आहे. त्यांच्या मुलाला फ्रीजवर चढून कप काढायला सांगितले आणि हा अनर्थ घडून आला. मुलाला फ्रीजवर चढताच करंट लागला आणि त्यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. नक्की वाचा: ठाण्याच्या वर्तकनगर मध्ये Domino's Pizza shop च्या कर्मचार्याचा वीजेचा झटका लागून जागीच मृत्यू .
सहायक पोलिस निरीक्षक गणेश खारगे या प्रकरणामध्ये तपास करत असून
अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर कामावर ठेवणे, कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणे याखाली गणेश जगताप याच्यावर बालकामगार सुधारीत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.