ठाण्याच्या वर्तकनगर मध्ये Domino's Pizza shop च्या कर्मचार्‍याचा वीजेचा झटका लागून जागीच मृत्यू
Death/ Murder Representative Image Pixabay

ठाण्याच्या (Thane)  वर्तकनगर (Vartak Nagar) मध्ये Domino's Pizza shop च्या कर्मचार्‍याचा वीजेचा झटका (Electrocution) लागून जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा कर्मचारी साफसफाई करताना त्याला वीजेचा झटका लागला. मृत कर्मचार्‍याचं नाव महेश अनंत कदम असून तो 24 वर्षांचा होता. बुधवार (7 फेब्रुवारी) च्या सकाळची सहाच्या सुमाराची ही घटना आहे. दरम्यान या अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्येही कैद झाली आहे.

वर्तकनगर पोलिस स्टेशन मध्ये सध्या या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. वृद्ध आईसोबत महेश राहत होता. तो घरातील एकमेव कमवता व्यक्ती होता. सुरूवातीला महेश डिलेव्हरी बॉय म्हणून डॉमिनोज मध्ये काम करत होता नंतर त्याचं काम बघून त्याला ठाण्याच्या वर्तकनगर मधील नळपाडा भागातील डॉमिनोज च्या दुकानात काम देण्यात आलं.

पहा ट्वीट

महेशने मंगळवारी रात्री नाईट शिफ्ट केली होती. ओव्हरटाईम करून बुधवारी सकाळी लवकर घरी जाण्यापूर्वी त्याने डोमिनोज मध्ये रोज प्रमाणे साफसफाई केली. बुधवारी सकाळी प्रेशर पाण्याने साफसफाई करताना वीजेची तार त्याला लागाली आणि झटका लागून त्याचा मृत्यू झाला, महेशचं जागीच मृत्यूमुखी पडणं चटका लावून जाणारं आहे. पोलिसांनी महेश मृतदेह ताब्यात घेत तो पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. नक्की वाचा: Madhya Pradesh Shocker: मित्रांसोबत खेळत असताना विजेचा झटका लागून 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू .

डॉमिनोज मधील या घटनेनंतर कायदेशीर कारवाई करत मृत महेशच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी डॉमिनोज पिझ्झा कंपनीकडे काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्याने महेश च्या पश्चात त्याच्या वृद्ध आईला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. डॉमिनोज पिझ्झा कंपनीने या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महेशच्या वृद्ध आईला न्याय द्यावा अन्यथा त्या कंपनीने  कायदेशीर लढाई लढावी, असे मत सामाजिक कार्यकर्त्या आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या प्रियंका शाद यांनी व्यक्त केले.