Madhya Pradesh Shocker: मित्रांसोबत खेळत असताना विजेचा झटका लागून 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू,
Representational Image

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील इंदौर येथे चार वर्षाच्या मुलाचा खेळताना विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगा मित्रांसोबत खेळत असताना, ही घटना घडली. इंदौर येथील संयुक्तगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुलाने चुकून विजेची तार हातात पकडली दरम्यान त्याला जोरात विजेचा झटका लागला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा- कार्यक्रमात कवीता सादर करताना कवीला ह्रदयविकाराचा झटका,)

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद असं मृत मुलाचे नाव आहे. रविवारी विनोद त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. त्यानंतर अचानक त्याने विजेची तार पकडली. त्याला आरडआरोड केल्यानं आजू बाजूच्या लोकांनी धाव घेतली. तो बेशुध्द अवस्थेत खाली पडला. घटनेची माहिती विनोदच्या आई आणि वडिलांना मिळाली. दोघांन्ही त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहित डॉक्टरांनी दिली.

विनोदचा विजेच्या ताराला चूकून स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात पसरताच, शोककला पसरली आहे. विनोदची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. विनोद रविवारच्या सुट्टीसाठी आजी आजोबांच्या घरी आला होता तेव्हा ही घटना घडली.