Building Collapsed In Kolkata: बांधकाम सुरु असलेली इमारत झोपड्यांवर कोसळली, दोघांचा मृत्यू (Watch Video)
Kolkatta PC ANI

Building Collapsed In Kolkata: पश्चिम बंगालच्या कोलकता येथे बांधकाम सुरु असलेली ५ मजली इमारत अचानक झोपड्यांवर कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना रविवारी  (१७ मार्च) रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहेत. ( हेही वाचा- भरधाव ट्रकने चिरडल्याने 4 मजूरांचा जागीच मृत्यू, 8 जखमी, कोल्हापूरात भीषण अपघात)

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोलकत्ता येथील मेटियाब्रुझ येथे ही घटना घडली. रविवारी मध्यरात्री बांधकाम सुरु असलेली इमारत अचानक समोर असलेल्या परिसरातील झोपड्यांवर कोसळली. इमारत कोसळल्याने अनेक जण मातीच्या ढीगाऱ्या खाली गेले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी बचाव कार्य पोहचले. ढीगाऱ्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पाहा व्हिडिओ

ढीगाऱ्याखाली काही मजूर अजून अडकल्याची भीती वर्तवली जात आहेत. परिसरात बचावकार्य सुरु आहे. पोलिस अधिकारी घटनेची पाहणी करत आहेत. आता पर्यंत ढीगाऱ्यातून १० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून  इमारतीचे बांधकाम सुरु होते. रात्री सर्वेजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेनंतर अनेकांनी आरडाओरड सुरु केला.