Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Kolhapur Accident: कोल्हापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी 17 मार्च रोजी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही घटना पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार हातकणंगले येथील पुलाजवळ घडली. ट्रकने मजुरांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या घटनेत 4 मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- गुजरात मध्ये खासगी बसचा अपघात, 35 प्रवाशी जखमी, रुग्णालयात उपचार सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार, मजूर सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत होते त्यावेळी पाठीमागून अचानक भरधाव ट्रक आला आणि जोरात धडक दिली. या धडकेत सचिन धनवडे (वय 40 ) बाबालाल इमाम मुजावर वय (50), विकास वड्ड (वय 32), श्रीकेश्वर पासवान (वय 60) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आले. पोलिस अपघात स्थळी येताच, त्यांनी मृतांना आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ट्रक कोल्हापूरच्या दिशेने येत होता. भरधाव ट्रक अनियंत्रित झाला आणि क्षणाधार्त मजूरांना उडविले. हा अपघात इतका भीषण होता की, यात 4 मजूरांचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड सुरु झाली. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. रुग्णावाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.