Gujarat Bus Accident: गुजरात मध्ये खासगी बसचा अपघात, 35 प्रवाशी जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
bus accident Gujarat

Gujarat Bus Accident: गुजरातच्या अंबाजी नगरीपासून हडद पाटीयाजवळ एका खासगी बसचा अपघात झाला. या बसमध्ये प्रवास करणारे ३५ प्रवासा जखमी झाले आहे. भादरवी पूनम जत्रेच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडलेली आहे, जखमींना पालनपूर येथील रुग्णालयात आणि अंबाजी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परतीच्या प्रवासात दुर्दैवी अपघात झाला.

पत्रकारांशी बोलताना बनासकांठा अक्षयराज मकवाना म्हणाले, "अंबाजीहून परतणाऱ्या बसने डोंगराला धडक दिल्याने 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पालनपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे."रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.

मोठ्या डोंगराला धडकल्याने हा अपघात घडून आला आहे, या भीषण अपघातात बसचा संपुर्ण चेंदामेंदा झाला आहे.