UGC | File Image | (Photo Credits: PTI)

युजीसीने (UGC) उपस्थित सत्र आणि नवीन प्रवेशांसाठी परीक्षा मार्गदर्शक सूचना (Exam Guidelines) तसेच शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर केली आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांनी 31 ऑगस्ट, २०२१ पर्यंत अंतिम वर्ष परीक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. विद्यापीठ प्रवेश २०२१ परीक्षा संदर्भात युजीसीने (University Grants Commission) असे म्हटले आहे की सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE )आणि इतरांच्या परीक्षांनंतरच विविध विद्यापीठांमधील यूजीसी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. राज्य मंडळाचा १२ वी निकाल सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार लवकरात लवक जाहीर करावा. नवीन शैक्षणिक सत्र 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार असल्याची माहिती यूजीसीने दिली. 16 जुलै 2021 च्या परिपत्रकात आयोगाने असे निदर्शनास आणून दिले आहे की सर्व राज्य मंडळे तसेच सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसईचा निकाल 31 जुलै 2021 पर्यंत जाहीर होईल. त्यानंतर 1 ऑगस्ट 2021 पासून नवीन प्रवेश घेण्यास सुरूवात होईल.

याशिवाय विद्यापीठांना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि नवीन अधिवेशन 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रिक्त जागा भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. तसेच नव्या प्रवेशासाठी कागदपत्रांची पूर्तता 1 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करणे गरजेचे आहे. 12वी परीक्षा निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्यास तर उच्च शिक्षण संस्था 1 ऑक्टोबरपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यात येईल. याव्यतिरिक्त, युजीसीने असेही म्हटले आहे की कोरोना साथीचा विचार करता, विद्यापीठे 1 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश मागे घेण्यासाठी कोणत्याही रद्दीकरण शुल्काची आकारणी करु शकणार नाहीत. मात्र या तारखेनंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश मागे घेतल्यास विद्यापीठे जास्तीत जास्त 1000 रुपये म्हणून शुल्क आकारू शकतात.

31 डिसेंबर 2021 पर्यंतच अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख राहील. युजीसीने राज्यात संबंधित मार्गदर्शक सूचना व प्रोटोकॉलनुसार अध्यापनाची पद्धत सुरु केली आहे. शिक्षण हे मिश्रित पद्धतीने सुरू राहील. तसेच, मार्गदर्शक तत्त्वे परीक्षा आणि शैक्षणिक वर्षासंबंधित संस्था आणि परिषदा सल्लागारांच्या म्हणण्यानुसार काम करतील.

 दरम्यान, काही राज्य मंडळाने 12 वीचे निकाल आधीच जाहीर केले आहेत. तसेच इतर राज्ये निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत आहेत. बहुतेक राज्य मंडळे 31 जुलै 2021 पर्यंत 12 वीचा निकाल जाहीर करतील. हिमाचल प्रदेश, बिहारने 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई, आयसीएसई 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करेल. अशी माहिती युजीसीने दिली आहे.