Drug Case: बेंगळुरूमध्ये 3 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यासह दोन नायजेरियन लोकांना अटक
प्रतिनिधी हेतूसाठी वापरलेली प्रतिमा  | (Photo Credits: Unsplash)

दोन नायजेरियन (Nigerian) लोकांना 3 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या (Drug) मोठ्या साठ्यासह अटक (Arrest) करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. सिक्स्टस आणि चुकवुदबेम अशी आरोपींची नावे आहे. दोघेही बेंगळुरूमधील होरामवू (Horamvu) भागातील रहिवासी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांकडून 1.5 किलो एमडीएमए क्रिस्टल्स, एमडीएमए मिक्स वॉटरसह दोन प्लास्टिकचे कॅन, 300 ग्रॅम विड ऑइल आणि 120 ग्रॅम एमडीएमए ब्लॉक्स जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली आणि एचबीआर लेआउटमधील (HBR layout) आंबेडकर मैदानाजवळ विदेशी नागरिकांना पकडण्यात आले.

या दोघांनी हे ड्रग्ज विद्यार्थी आणि उद्योजकांना विकण्यासाठी साठा करून ठेवला होता, अशी माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी गोविंदापुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडले. हेही वाचा Pegasus Spyware: पेगासस प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडून तपास; अहवालाची प्रतिक्षा