Suicide Case In Karnataka: दावणगेरे येथील दोन महाविद्यालयी विद्यार्थ्यांचा प्राव्हेट व्हिडिओ (Private Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आत्महत्या (Suicide) केली अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या टेरेसवरील विद्यार्थ्यांच्या प्राव्हेट क्षणांचा व्हिडिओ 25 जुलै रोजी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. महाविद्यालयात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल घेत तपासणी सुरु केली.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तरुणीने शुक्रवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. तिच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर,तिच्यासोबत असणाऱ्या मुलानेही शुक्रवारी रात्री आत्महत्या केली, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या धक्कादायक घटनेमुळे महाविद्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ( हेही वाचा- विराट रुमचा प्राव्हेट व्हिडीओ)
या घटनेनंतर, दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आणि त्यांच्या संमतीशिवाय व्हिडिओ चित्रित केल्याबद्दल आणि त्याचा प्रसार केल्याबद्दल जबाबदारी मागितली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दावणगेरेचे पोलिस अधीक्षक के अरुण यांनी शनिवारी माध्यमांसी बोलताना सांगितले की, या घटनेतील आरोपीची तपासणी सुरू आहे.
कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे जिथे तीन विद्यार्थ्यांना एका खाजगी पॅरामेडिकल महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले होते कारण ती महाविद्यालयीन वॉशरूममध्ये असताना दुसर्या विद्यार्थ्याचे व्हिडिओ शुट केल्याचा आरोप केला आहे.