
Uttar Pradesh Shocker: दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे. दर दोन ते तीन दिवसांत १० ते १५ घटना समोर येत असतात. त्यात दोन वर्षापासून घरकाम करणाऱ्या एका नोकराने मालकाच्या घरातून सोनं आणि लाखो रक्कम चोरी केले. ही उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहे. मालकाला झोपेच्या गोळ्या देत घरातून सोनं आणि रोख रक्कम चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी तीन जणांना अटक केले आहे. चोराने त्याच्या वडिलांच्या आणि दुरच्या नातेवाईकांच्या मदतीने मालकाच्या घरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. (हेही वाचा- मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, जोधपूरमध्ये बेकायदेशीर एमडी ड्रग्जच्या कारखान्यात छापा,)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षापूर्वी तरुणाला घरात नोकर म्हणून कामाला ठेवले होते. काही दिवसांपासून नोकराने मालकाला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या बदलून झोपेच्या गोळ्या देऊ लागला. नोकराने हीच संधी साधून घरातून हळूहळू लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने चोरले. १५.५ लाख रुपयांचे दागिने आणि १ लाखहून अधिक रक्कम चोरली. चोरीची घटना समोर येताच, मालकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली.
पोलिस उपायुक्त दुर्गेश कुमार यांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. रविवारी पोलिसांनी नोकर मोहम्मदला अटक केली. त्याचे वडिल मोहम्मद शरिफ (४०) आणि शकिलला अटक केले. पोलिसांनी चोरांकडून ५०,००० रक्कम जप्त केली. त्यानंतर तीघांना अटक करत त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या लक्षात आले की, मालकाला चूकीचे (झोपेचे) औषध देत असल्यामुळे ही घटना घडली.