MD Drugs Factory Busted: मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूरमध्ये एमडी ड्रग्जच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 107 कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज तयार होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी एक टीम तयार करून जोधपूरमध्ये छापा टाकला, तेथून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.  (हेही वाचा- प्रोटीन सप्लिमेंट्सबद्दलचे धक्कादायक सत्य आले समोर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)