Man Died of Snake Bite: भगवान शिवाची वेशभूषा केलेल्या तरुणाला गळ्यात लटकलेल्या सापाने घेतला चावा; मृतदेह टाकून कीर्तनकार मंडळींनी काढला पळ
Snake (PC -Pixabay)

Man Died of Snake Bite: बिहार (Bihar) मधील मधेपुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज दुर्गास्थान मंदिर परिसरात बुधवारी रात्री उशिरा अष्टयम दरम्यान भगवान शिवाची वेशभूषा केलेल्या एका व्यक्तीला गळ्यात लटकलेल्या सापाने चावा (Snake Bite) घेतला. यात 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

मुरलीगंज दुर्गा मंदिर परिसरात अष्टयमावर भजनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी स्थानिक भाविकांना आनंद मिळावा म्हणून भोलेनाथ बनलेल्या तरुणाच्या गळ्यात साप लटकवण्यात आला. तेव्हाच या तरुणाच्या गळ्याला लटकलेल्या विषारी सापाने चावा घेतला, त्यानंतर आयोजकांसह भजन मंडळींनी त्यांना बाहेर काढले. मात्र, लोकांच्या अंधश्रद्धेमुळे तरुणाचा मृत्यू झाला. नंतर लोकांनी त्या तरुणाला जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तेथून त्याला मधेपुरा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, पण वाटेतच तरुणाचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Delhi Tihar Jail Gang War: दिल्लीच्या तिहार कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा टोळीयुद्ध; 21 कैदी जखमी)

यानंतर आयोजकासह भजन कीर्तन मंडळींनी मुरलीगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात मृतदेह टाकून पळ काढला. डॉ.लालबहादूर यांनी तरुणाचा मृतदेह पडून असल्याचे पाहून पोलिसांना माहिती दिली. मात्र, या प्रकरणाचा तपास करत पोलीस आयोजक आणि कीर्तन भजन मंडळींचा शोध घेत आहेत. त्याचवेळी, मृतदेहाची ओळख 30 वर्षीय मुकेश कुमार असून तो कुमार खांड पोलीस स्टेशन हद्दीतील खुर्दा गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना डॉ. लाल बहादूर यांनी सांगितले की, आम्ही त्याला तात्काळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर केले. मात्र या तरुणाचा वाटेतच मृत्यू झाल्याने मृतदेह येथेच टाकून मंडळी पळून गेली, त्यानंतर आम्ही पोलिसांना कळवले. मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.